बस अपघातात विद्यार्थिनी ठार

By Admin | Updated: May 20, 2016 23:58 IST2016-05-20T23:47:37+5:302016-05-20T23:58:55+5:30

काष्टी : मिनी बसला कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर बारा भाविक जखमी झाले. मृतात विद्यार्थिनीचा समावेश आहे.

Student killed in bus accident | बस अपघातात विद्यार्थिनी ठार

बस अपघातात विद्यार्थिनी ठार

काष्टी : मिनी बसला कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर बारा भाविक जखमी झाले. मृतात विद्यार्थिनीचा समावेश आहे. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टीनजीक गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.
श्रृती दत्तात्रय कन्नमवार (वय १७, ता. भोकर, जि. नांदेड) हिचा मृतात तर जखमींमध्ये धनश्री मनोज कन्नमवार, पूजा नितीन कन्नमवार, लिना लेबुरवाल, सुलभा पुजेवाड, प्रतिभा दत्तात्रय सुदनवार, दिव्या संजय एकुलवार, आकांक्षा विजय दुन्नेवार, साई एकुलवार, विजय सत्यनारायण, बुद्धीवार बाळासाहेब सुदनवार यांचा समावेश आहे.
भोकर, माहूरगड तालुक्यातील भाविक तीर्थयात्रेसाठी मिनी बसने जात होते.
सिद्धटेक येथील गणपतीचे दर्शन घेऊन दौंड- काष्टी मार्गे हे भाविक रांजणगाव येथील गणपतीच्या दर्शनासाठी जात होते. साईकृपा डेअरीसमोरील एका हॉटेलमध्ये चालक रघुनाथ जाधव गेला असता दौंडकडून आलेल्या कंटेनर (एम. एच. ४३, ई. ७६५५) रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मिनी बसवर (एम. एच. २९, एम. ८३७८) आदळला.
याबाबतची फिर्याद शशिकांत कन्नमवार यांनी दिली. त्यानुसार श्रीगोंदा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Student killed in bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.