पालकमंत्री राम शिंदे यांच्या नावाने फसवणूक करणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:13 IST2019-07-09T13:07:45+5:302019-07-09T13:13:30+5:30
पालकमंत्री राम शिंदे यांचे नाव सांगून सरकारी नोकरीचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणा-यास पोलीसांनी अटक केली.

पालकमंत्री राम शिंदे यांच्या नावाने फसवणूक करणा-यास अटक
अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांचे नाव सांगून सरकारी नोकरीचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणा-यास पोलीसांनी अटक केली. अक्षय अविनाश शिंदे( चौंडी ता.जामखेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अक्षय शिंदे हा पालकमंत्री राम शिंदे यांचे नाव सांगून अनेकांची फसवणूक करत होता. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला मुंबईतून अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी कर्जतमध्ये आणण्यात आले आहे.