संगमनेरात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:21 IST2021-03-16T04:21:12+5:302021-03-16T04:21:12+5:30
बँकर्स क्लब ऑफ संगमनेरचे पदाधिकारी व सदस्य यात सहभागी झाले होते. हाती फलक धरत राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यात ...

संगमनेरात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
बँकर्स क्लब ऑफ संगमनेरचे पदाधिकारी व सदस्य यात सहभागी झाले होते. हाती फलक धरत राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यात आला. याबाबत माहिती देताना बँकर्स क्लब ऑफ संगमनेरचे सदस्य सुधाकर जोशी म्हणाले, बँकेच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या शिखर संघटनेने १५ व १६ मार्चला संपाची हाक दिली आहे. त्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी १५ मार्चला संगमनेर येथे संगमनेर शहर, तालुका, अकोले, राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील सर्व बँक कर्मचारी एकत्रित आले होते. सरकारला जर या संपाने जाग येणार नसेल तर भविष्यात बेमुदत संप करून आणखी जोरदार निदर्शने करण्यात येतील, असेही जोशी म्हणाले.
या वेळी वैभव कदम, अरविंद कचरे, सचिन कडलग, विजय डोंगरे, अनिरुद्ध मैड, महेश कात्रजकर, नितीन पांडे आदी या वेळी उपस्थित होते. १६ मार्चला संध्याकाळी सात वाजता कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे.
...