श्रीगोंदा तालुक्यात कडकडीत बंद

By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:07+5:302020-12-09T04:16:07+5:30

शासकीय कार्यालये, बँका, पतसंस्था, दवाखाने, मेडिकल व एसटी बससेवा नेहमीप्रमाणे चालू होती. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व अरविंद ...

Strictly closed in Shrigonda taluka | श्रीगोंदा तालुक्यात कडकडीत बंद

श्रीगोंदा तालुक्यात कडकडीत बंद

शासकीय कार्यालये, बँका, पतसंस्था, दवाखाने, मेडिकल व एसटी बससेवा नेहमीप्रमाणे चालू होती. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व अरविंद माने यांनी आंदोलनास गालबोट लागू नये खबरदारी घेतली.

श्रीगोंदा शहर, कोळगाव, काष्टी, बेलवंडी, मांडवगण, आढळगाव, अजनुज, लोणी व्यंकनाथ, देवदैठण, विसापूरमध्ये व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. श्रीगोंदा, चिंभळे, घोगरगाव, पारगाव फाट्यावरील उपबाजार केंद्र बंद होते. आठवडे बाजार आणि कधी बंद न राहणारे लिंबू उपकेंद्रही बंद होते. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा तालुका व्यापारी असोसिएशन सामील झाली होती.

कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप व त्यांच्या अधिकारी, कामगारांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट म्हणाले, विरोधी पक्षांनी कृषीविषयक मोदींनी मंजूर केलेले कायदे समजून न घेता फक्त विरोधासाठी विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक मारली. विरोधकांची भूमिका दिशाभूल करणारी आहे, असे ते म्हणाले.

...

०८बेलवंडी बंद

Web Title: Strictly closed in Shrigonda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.