करंजीत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:22 IST2021-04-04T04:22:05+5:302021-04-04T04:22:05+5:30
करंजी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पाथर्डी तालुक्यातील कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी येथे ग्रामस्थांनी एकत्र येऊन कडकडीत बंद पाळला. ...

करंजीत कडकडीत बंद
करंजी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पाथर्डी तालुक्यातील कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी येथे ग्रामस्थांनी एकत्र येऊन कडकडीत बंद पाळला. येथे हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवासी येथे थांबतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका लक्षात घेऊन येथील ग्रामपंचायतीने हॉटेल चालक व इतर व्यावसायिकांना आपल्या जिवासाठी व आरोग्यासाठी चार दिवस व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास १०० टक्के बंद पाळून व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. सतत वर्दळ व गजबजलेल्या स्टॅण्ड परिसरात शुकशुकाट होता. ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी बैठक घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सूचना दिल्या. यावेळी सरपंच बाळासाहेब अकोलकर, रफिक शेख, अमोल वाघ, सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक, जालिंदर वामन, तहसीलदार, तालुका आरोग्याधिकारी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आदींची उपस्थिती होती.
--
०३ करंजी