बेलापूरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:29+5:302021-03-07T04:19:29+5:30

सर्व व्यवहार बंद असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. तसेच बेलापूर खुर्द येथील व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध ...

Strictly closed in Belapur | बेलापूरात कडकडीत बंद

बेलापूरात कडकडीत बंद

सर्व व्यवहार बंद असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. तसेच बेलापूर खुर्द येथील व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध केला. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील हे शुक्रवारी सायंकाळी आपल्या फौजफाट्यासह बेलापूर गावात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हिरण यांच्या गोडाऊनला भेट दिली तसेच परिसरातील फुटेजचीदेखील पहाणी केली. तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली असून, पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितले.

उपसरपंच अभिषेक खंडागळे, माजी सरपंच भरत साळुंके, देविदास देसाई, राम पौख, प्रशांत लढ्ढा, प्रशांत शहाणे, पंकज हिरण, साहेबराव वाबळे, योगेश नाईक, राहुल लखोटिया, प्रसाद खरात, सचिन वाघ, विशाल आंबेकर, अमोल गाढे, संजय नागले यांनी तपासाबाबत जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याशी संवाद साधला. आरोपींना तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप उपस्थित होते.

फोटो -०६ बेलापूर

बेलापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

Web Title: Strictly closed in Belapur