अकोलेत कडकडीत बंद

By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:25+5:302020-12-09T04:16:25+5:30

किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत, राष्ट्र सेवा दलाचे विनय सावंत, भाकपचे ...

Strictly closed in Akole | अकोलेत कडकडीत बंद

अकोलेत कडकडीत बंद

किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत, राष्ट्र सेवा दलाचे विनय सावंत, भाकपचे कारभारी उगले, काँग्रेसचे दादा पाटील वाकचौरे, मीनानाथ पांडे, भानुदास तिकांडे, राजेंद्र कुमकर, बाळासाहेब नाईकवाडी, विकास बंगाळ, शांताराम संगारे, संपत कानवडे, दिलीप शेणकर, डाॅ. संदीप कडलग, आरीफ तांबोळी, खंडू वाकचौरे, भाऊसाहेब नवले, गणेश कानवडे, सेनेचे महेश नवले, मनसेचे दत्ता नवले आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी व कॉर्पोरेट पुरस्कृत शेती धोरणांना विरोध करण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाला आणखी तीव्र करण्यासाठी किसान संघर्ष समन्वय समिती व किसान संयुक्त मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला देशभर अत्यंत जबरदस्त प्रतिसाद मिळाला. भारत बंदला मिळालेला प्रतिसाद पाहता ९ डिसेंबर रोजी दिल्लीत सरकार व शेतकरी संघटना यांच्यात होत असलेल्या चर्चेत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, सलग १३ दिवस आंदोलन व भारत बंद करूनही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा साकल्याने विचार केला नाही, तर मात्र शेतकऱ्यांना यापुढे संयम ठेवणे अशक्य होईल. केंद्र सरकारने यापेक्षा आक्रमक आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणू नये, असे डॉ. अजित नवले म्हणाले.

Web Title: Strictly closed in Akole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.