कडित प्रादेशिक पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:20+5:302021-08-14T04:25:20+5:30

उक्कलगाव : तालुक्यातील पश्चिमेस असणारे क्षारयुक्त पाणी पट्ट्यातील सहा गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या कडित प्रादेशिक पाणीपुरवठा विस्तारिकरण योजनेचे ...

Strict regional water supply | कडित प्रादेशिक पाणीपुरवठा

कडित प्रादेशिक पाणीपुरवठा

उक्कलगाव : तालुक्यातील पश्चिमेस असणारे क्षारयुक्त पाणी पट्ट्यातील सहा गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या कडित प्रादेशिक पाणीपुरवठा विस्तारिकरण योजनेचे गुरुवारी सर्वेक्षण करण्यात आले. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षणाचा प्रारंभ गळनिंबचे सरपंच व पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष शिवाजी चिंधे, उपाध्यक्ष सविता वडितके, जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता सु. दा. हरदास, कडितचे सरपंच ज्ञानेश्वर वडितके, फत्याबादचे सरपंच शंकर वरखड, मांडवेच्या सरपंच पुष्पा चितळकर, कुरणपूरच्या सरपंच मनीषा पारखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच योजनेचा आराखडा तयार करून तांत्रिक मंजुरी घेऊन कार्यारंभ आदेश मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

परिसराच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेला ३६ वर्षे पूर्ण होत आहेत. १९९५मध्ये जागतिक बॅंकेच्या सहकार्याने योजना यशस्वी कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, लोकसंख्या वाढीचा विचार करून व अद्याप वाड्या वस्त्यांवरील पाणी पुरवठा सुरळीत होऊ न शकल्याने या वाढीव प्रस्तावाची मागणी केली जात होती. त्या लढ्यास आता यश आले आहे. यावेळी मांडवेचे उपसरपंच गोविंद तांबे, कडितचे उपसरपंच निखिल वडितके, दत्तात्रय माळी, साहेबराव भोसले, आण्णासाहेब मारकड, संदीप शेरमाळे, राजेंद्र देठे आदी उपस्थित होते.

-------

फोटो ओळी : पाणीपुरवठा योजना

गळनिंब व कडित प्रादेशिक पाणीपुरवठा विस्तारीकरण योजनेचे सर्वेक्षण करताना प्रशासकीय अधिकारी.

--------

Web Title: Strict regional water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.