नगर जिल्ह्याच्या विभाजनासाठी आमदारांचा विधानभवनाच्या पाय-यांवर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 14:29 IST2018-03-15T14:29:31+5:302018-03-15T14:29:47+5:30
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झालेच पाहिजे, या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील आमदारांनी गुरुवारी (दि. १५) सकाळी १०.३० वाजता विधान भवन प्रवेशद्वाराच्या पाय-यांवर बसून घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.

नगर जिल्ह्याच्या विभाजनासाठी आमदारांचा विधानभवनाच्या पाय-यांवर ठिय्या
अहमदनगर : जिल्ह्याचे विभाजन झालेच पाहिजे, या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील आमदारांनी गुरुवारी (दि. १५) सकाळी १०.३० वाजता विधान भवन प्रवेशद्वाराच्या पाय-यांवर बसून घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. नगर जिल्ह्याचे विभाजन करावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
नेवासा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, कोपरगाव मतदार संघाच्या आमदार स्नेहलता कोल्हे, शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, पारनेरचे आमदार विजय औटी, श्रीगोंदयाचे आमदार राहुल राजळे, श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, अकोल्याचे आमदार वैभव पिचड आदींनी यावेळी घोषणाबाजी करत नगर जिल्ह्याच्या विभाजनाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यावेळी उपस्थित होत.
सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे प्रवेशद्वाराजवळ आगमन झाल्यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांनी वरील सर्व आमदारांच्या वतीने जिल्हा विभाजनाच्या संदर्भातील सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दले. त्यानंतर विधानभवनात जाणा-या सर्व आमदाराकडेही या संदर्भात पाठींबा द्या, अशी मागणी केली.
सद्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये जिल्हा विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर यावा व तो लवकरात लवकर सुटावा म्हणून नगर जिल्ह्यातील आमदारांनी आज विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.