धनगर समाजाचा रास्तारोको
By Admin | Updated: August 5, 2014 23:58 IST2014-08-05T23:43:04+5:302014-08-05T23:58:26+5:30
करंजी : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मंगळवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धनगर समाजाचा रास्तारोको
करंजी : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मंगळवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
१५ आॅगस्टपर्यंत धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या घरावर धनगर समाजाच्यावतीने महामोर्चा काढणार नेण्यात येणार आहे. तसा इशारा धनगर समाज कृती समितीने यावेळी दिला.
यावेळी धनगर समाजाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत धनगर समाजाला काँग्रेस, राष्ट्रवादीने आरक्षण न दिल्यास पक्षाच्या विविध पदांचे सामूहिक राजीनामे देऊन विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याचा इशारा काँग्रेसच्या महिला सेलच्या जिल्हाध्यक्षा अनिता वेताळ, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा लता तागड यांच्यासह अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला.
धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणाने पिचड, वळवी यांचा निषेध करण्यात आला. धनगर समाजाच्यावतीने नवनाथ सोलाट, नारायण सोलाट, महेंद्र सोलाट, बाळासाहेब शिपनकर यांनी धनगर समाजाच्या भावना समजावून घेण्याचे आवाहन केले.
तहसीलदार सुभाष भाटे यांना निवेदन देण्यात आले आपल्या भावना राज्य शासनाला कळविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (वार्ताहर)