वादळी वाऱ्याने नगर शहरात ३० ठिकाणी उन्मळून पडली झाडे; घरांसह वीज तारांचे नुकसान
By अरुण वाघमोडे | Updated: April 14, 2023 19:35 IST2023-04-14T19:35:13+5:302023-04-14T19:35:21+5:30
अहमदनगर : शहरात गुरुवारी रात्री अवकाळी पावसासह झालेल्या जोरदार वादळाने २५ ते ३० ठिकाणी झाडे उन्मळून पडली, काही ठिकाणी ...

वादळी वाऱ्याने नगर शहरात ३० ठिकाणी उन्मळून पडली झाडे; घरांसह वीज तारांचे नुकसान
अहमदनगर : शहरात गुरुवारी रात्री अवकाळी पावसासह झालेल्या जोरदार वादळाने २५ ते ३० ठिकाणी झाडे उन्मळून पडली, काही ठिकाणी झाडांच्या फाद्या घरांवर, भिंतीवर तर विजेच्या खांबावर पडल्याने मोठे नुकसान झाले. शहरात गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळ झाले.
पाऊस कमी आणि वादळ जास्त असल्याने काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सावेडी उपनगरात सर्वाधिक झाडे पडल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजान यांनी सांगितले. शहरातील बालिकाश्रम रोड, सावेडी गावठाण, तोफखाना परिसर, प्रेमदान हडको, निर्मलनगर आदी परिसरात झाडे पडली.
दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून मनपाचे उद्यान विभागप्रमुख शशिकांत नजान यांच्यासह कर्मचारी बबन काळे, विजय कुलाळ, गणेश दाणे, राम हुच्चे, मच्छिंद्र आंबेकर, दत्तात्रय नवाळे, साजीद शेख यांनी तातडीने रस्त्यावर पडलेली झाडे व फांद्या हटवून रस्ता मोकळा केला. रासनेनगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या केेलेल्या कारवर एक झाड कोसळले, तर बालिकाश्रम रोडवर रस्त्याच्या मधोमध नारळाचे झाड उन्मळून पडले.