शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

 नगर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; संत्र्यांसह फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:50 IST

खडकी, खंडाळा, सारोळा कासार, अकोळनेर, वाळकी, बाबुर्डी बेंद, सारोळा बद्दी, साकत, रूईछत्तीशी या नगर तालुक्यातील गावांना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयाचा जोरदार तडाखा बसला. यात संत्र्यासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले.

केडगाव   : खडकी, खंडाळा, सारोळा कासार, अकोळनेर, वाळकी, बाबुर्डी बेंद, सारोळा बद्दी, साकत, रूईछत्तीशी या नगर तालुक्यातील गावांना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयाचा जोरदार तडाखा बसला. यात संत्र्यासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले.बाजारात नेण्यासाठी तयार झालेल्या संत्रा झाडावरुन गळून पडल्या. ५०  हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील संत्रा बागांना फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. एकट्या खडकीमध्ये १०० एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर संत्रा फळबागा लागवड आहे. मागील वर्षी २०१८-१९ च्या कडक दुष्काळातही टँकरने पाणी घालून कसे बसे फळबागा जगवल्या आहेत. २०९१ च्या पावसाळ्यात ही या भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असताना येथील शेतकरी आजही  फळबागांना टँकरने पाणी घालत आहेत. त्यासाठी एकरी दीड ते दोन लाख खर्च केला आहे. फळबागां विक्रीला आलेल्या आहेत. त्यातच अनेक ठिकाणी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे माल विक्रीला जात नाही. त्यात वादळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.मार्चच्या पहिल्या आठवड्यात वादळी पावसाने संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले. परंतु त्याचे पंचनामे झाले नाहीत. आता आम्ही सर्व व्हिडीओ काढून ठेवले आहेत. आता तरी कृषी अधिकाºयांनी योग्य तो अहवाल द्यावा आणि पंचनामे करावेत, असे खडकी येथील शेतकरी राहुल बहिरट यांंनी सांगितले.आमच्या सारोळा गावातही वादळी वाºयासह जोरदार पावसाचा शिडकावा झाला. यात तोडणीसाठी तयार झालेले संत्रा फळे झाडावरून गळून नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास असा वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे शेतकरी भगवान डाके यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीfruitsफळेRainपाऊस