वादळाचा तडाखा, वीजपुरवठा ठप्प
By Admin | Updated: June 11, 2014 00:18 IST2014-06-10T23:46:29+5:302014-06-11T00:18:58+5:30
अहमदनगर : सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शहरात अक्षरक्ष: दाणादाण उडाली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.
वादळाचा तडाखा, वीजपुरवठा ठप्प
अहमदनगर : सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शहरात अक्षरक्ष: दाणादाण उडाली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. काळाकुट्ट अंधार पडला आणि धो-धो पावसाने शहर धुतले. मृगाच्या पहिल्याच पावसाचा रुद्रावतार पहायला मिळाला. विजेचे शेकडो खांब वाकले. वीज तारा जमिनीवर आल्या. शहरातील शेकडो झाडे उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाले. बोल्हेगावमध्ये घर कोसळून एकाचा मृत्यू झाला. शहरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. २४ तास उलटले तरी अनेक भागातील वीज पुरवठा मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता. सोमवारी नागरिकांनी रात्र अक्षरक्ष: जागून काढली. जागोजागी रस्त्यावर झाडे आणि विजेचे खांब आडवे पडलेले होते. शहराची पाणी पुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली. नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली. मंगळवारी निर्जळीवरच दिवस काढावा लागला. (प्रतिनिधी)