पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसराला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 17:53 IST2018-06-06T17:42:40+5:302018-06-06T17:53:10+5:30
पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरातील कौडगाव (आठरे), जोहारवाडी, राघुहिवरे, निंबोडी परिसराला मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास वादळाचा जोरदार तडाखा बसला.

पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसराला वादळाचा तडाखा
करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरातील कौडगाव (आठरे), जोहारवाडी, राघुहिवरे, निंबोडी परिसराला मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास वादळाचा जोरदार तडाखा बसला. वादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे पॉलीहाऊस जमीनदोस्त झाले. तर अनेक फळबागांचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेत वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झालेली असलीतरी सुदैवाने जिवीतहानी टळली.
नुकसानीची माहिती मिळताच पाथर्डीचे तहसिलदार नामदेव पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करुन त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. मंगळवारी रात्री ११ वाजता मेघगर्जनेसह परिसरातील कौडगाव, जोहारवाडी, राघु हिवरे, निबोंडी गावात पाऊस व वादळाने थैमान घातले. या वादळात परिसरातील मोठे वृक्ष उन्मळून पडले. अनेक वाडया- वस्त्यावरील पत्रे उडाले.
कौडगाव येथील मधुकर मारूती आठरे, शुभांगी विकास उदमले, कान्हु पाटीलबा आठरे, विकास गंगाधर उदमले, हिराबाई महादेव आठरे या शेतकºयांनी मोठा खर्च करुन बांधलेले पॉलिहाऊस जमिनदोस्त झाली आहेत. वादळामुळे पिकांचेहीे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतक?्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. फळबागा तसेच अनेक घरे, गोठ्यावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले.