वादळात घरे, फळबागा भुईसपाट
By Admin | Updated: June 5, 2014 00:09 IST2014-06-04T23:25:15+5:302014-06-05T00:09:20+5:30
अहमदनगर: मंगळवारी सायंकाळी कर्जत, राहुरी तालुक्याला वादळी पावसाने झोडपून काढले. या वादळाने राहुरी तालुक्यात दोघांचा बळी गेला.
वादळात घरे, फळबागा भुईसपाट
अहमदनगर: मंगळवारी सायंकाळी कर्जत, राहुरी तालुक्याला वादळी पावसाने झोडपून काढले. या वादळाने राहुरी तालुक्यात दोघांचा बळी गेला. अनेक घरावरील शाळांचे पत्रे उडाली. झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. कर्जत तालुक्यातही फळबाग, पिकांचे नुकसान झाले. शेवगाव तालुक्याला पावसाने झोडपले. मंगळवारीे झालेल्या वादळाने घरावरील पत्रे उडाल्याने अनेक जण बेघर झाले. दरम्यान, शेवगाव तालुक्यात ढोरजळगाव येथे बुधवारी रात्री पंढरीनाथ गोपीनाथ पाटेकर यांच्या छपरावर वीज कोसळून एक म्हैैस, चार शेळ्या, दोन गायी, पाच वासरे दगावली. तर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.