पाथर्डीत अतिक्रमणे हटवण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 11:46 IST2018-12-19T11:46:19+5:302018-12-19T11:46:35+5:30

शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता शहर विकासासाठी सरसकट अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंतराव नाईक चौकात रास्तारोको करण्यात आला.

Stop the way to remove encroachments in Pathard | पाथर्डीत अतिक्रमणे हटवण्यासाठी रास्ता रोको

पाथर्डीत अतिक्रमणे हटवण्यासाठी रास्ता रोको

पाथर्डी : शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता शहर विकासासाठी सरसकट अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंतराव नाईक चौकात रास्तारोको करण्यात आला.
शहरातील तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जुने बसस्थानक ते खेर्डा रोड ते जुना साकेगाव रस्ता, नाईक चौक ते तनपुरवाडी रस्ता, चिंचपूर रोड, तहसील कार्यालय ते जुने बस स्थानक, नगरपरीषदेचे खुले भूखंड याठिकाणी धनदांडग्या राजकीय पुढा-यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमणे करून बेकायशीरपणे व्यवसाय थाटले. ही अतिक्रमणे काढण्यासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदने देवूनही काहीच कार्यवाही होत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा.किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा निमंत्रक अरुण जाधव, अरविंद सोनटक्के, बंडू भांडकर, किसन आव्हाड, तुकाराम पवार, रविंद्र म्हस्के, सुनील जाधव, राजेंद्र काळे, अस्तान चव्हाण, बंडू भांडकर, दीपक वराट, सुकदेव मदार्ने, पार्वती थोरात, किरण पालवे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता डॉ. बाबसाहेब आंबेकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु केल आहे. बुधवारचा बाजार दिवस असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Web Title: Stop the way to remove encroachments in Pathard