पाणीप्रश्नी रास्ता रोको
By Admin | Updated: July 10, 2014 00:35 IST2014-07-09T23:37:56+5:302014-07-10T00:35:26+5:30
शेवगाव : खंडित पाणी पुरवठा तातडीने सुरु करावा, या प्रमुख मागणीसाठी पांढरीपूल-शेवगाव मार्गावर गुरुवारी ग्रामस्थांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
पाणीप्रश्नी रास्ता रोको
शेवगाव : खंडित पाणी पुरवठा तातडीने सुरु करावा, या प्रमुख मागणीसाठी पांढरीपूल-शेवगाव मार्गावर गुरुवारी ग्रामस्थांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अनिल म्हस्के, योसेफ कळकुंबे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात सामनगाव व लोळेगाव येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
शेवगाव-पाथर्डी पाणी योजनेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन वडुले बुद्रुक शिवारात फुटल्याने सामनगाव व लोळेगाव या दोन्ही गावांचा पाणी पुरवठा गेल्या आठवड्यापासून बंद आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दुसरी कुठलीच व्यवस्था नसल्याने या दोन्ही गावांमधील नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. आंदोलनामुळे शेवगाव- पांढरीपूल मार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. आंदोलनप्रसंगी महिलांच्या भावना तीव्र होत्या.
आंदोलनात सुजाता सावंत, गजराबाई कळकुंबे, विमल कांबळे, जनाबाई सातपुते, हिराबाई झाडे, राजेंद्र शिनगारे, रावसाहेब गोसावी, बबन जाधव, संजय खरड तसेच परिसरातील महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
(तालुका प्रतिनिधी)
चर्चेअंती आंदोलन मागे
मोकळे हंडे घेऊन महिलांनी रस्त्यावर ठाण मांडले होते. शेवगाव-पांढरीपूल रस्ता सकाळी आठपासून महिला व पुरुषांनी रोखून धरला होता. पाणी पुरवठा योजनेचे शाखा अभियंता बबन खोले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाणी योजनेच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्याशी चर्चा करुन पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतरच रास्ता रोको मागे घेण्यात आला.