चोर्‍यांचे सत्र थांबेना !

By Admin | Updated: May 28, 2014 00:14 IST2014-05-28T00:03:18+5:302014-05-28T00:14:53+5:30

कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण सध्या चोरट्यांच्या लक्षस्थानी आहे. गुरुवारी मध्यरात्री पोपट सुपेकर यांच्या बंगल्यावर दरोडा टाकून सुरू झालेले चोर्‍यांचे सत्र अजुनही सुरूच आहे.

Stop the thieves session! | चोर्‍यांचे सत्र थांबेना !

चोर्‍यांचे सत्र थांबेना !

चोर्‍यांचे सत्र थांबेना ! कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण सध्या चोरट्यांच्या लक्षस्थानी आहे. गुरुवारी मध्यरात्री पोपट सुपेकर यांच्या बंगल्यावर दरोडा टाकून सुरू झालेले चोर्‍यांचे सत्र अजुनही सुरूच आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चोरट्यांनी कोपर्डी मार्गालगतच्या एका घराला ‘लक्ष्य’ केले. चोरटे घराचे कुलूप तोडून प्रवेश करणार तोच जागृत गस्तीपथकातील युवकांनी गज, काठ्या, कुºहाडी घेऊन पाठलाग केल्याने चोरट्यांचा डाव फसला. गस्ती पथक दक्ष कुळधरण-कोपर्डी मार्गालगत कुकडीच्या मुख्य चारीनजीक गणेश शिवाजी शिरोळे यांचेच घर आहे. चोरट्यांच्या दहशतीमुळे शिरोळे कुटुंब झोपण्यासाठी पाचशे मीटर अंतरावरील जगताप वस्तीवर येतात. सोमवारी रात्री शिरोळे यांच्या घराभोवती कुत्रे भुंकल्याचा आवाज व बॅटर्‍यांचा उजेड दिसल्याने जगताप तसेच सुपेकर वस्तीवरील गस्ती पथक दक्ष झाले. घराला वेढा पोलीस पाटील समीर जगताप यांना माहिती दिल्यानंतर ते गावातील तीस ते चाळीस युवकांसह आले. सर्वांनी घराला वेढा टाकण्याचे नियोजन केले. त्यानुसार गज, काठ्या, कुºहाडी, कोयते घेऊन ७० ते ८० युवकांनी शिरोळे यांच्या घराला वेढले. काही युवक अंधारात लपत घरानजीकच्या कॅनॉलजवळ गेले. चार चोरटे कुलूप तोडण्याचा प्रयत्नात होते. तर दोघे घरासमोरील पुलावर बसल्याचे दिसले. युवकांनी तीन बाजुंनी घराला वेढले. मात्र कोपर्डी जंगलाच्या बाजुने कोणीच जाऊ न शकल्याने अखेर चोरट्यांनी बॅटर्‍या बंद करून जंगलात धूम ठोकली. (वार्ताहर)गस्ती पथकातील काही युवकांकडे बंदुका असल्याने तसेच जमलेल्या लोकांची संख्या शंभरावर गेल्याने युवकांनी जंगलातच चोरट्यांची शोध मोहीम आखली. युवकांचे गट करून जंगलातील पाऊवाटेने दुचाकी नेत युवकांनी तब्बल तीन तास जंगलातील ओढे, नाले, खाचखळगे हा भाग पिंजून काढला. मात्र चोरट्यांनी सर्वांना चकवा देत तेथून पलायन केले. कोपर्डीच्या जंगलात युवकांकडून चोरट्यांचा शोध सुरू असताना रात्री दीड सुमारास सायरन वाजवत पोलिसांची गाडी कोपर्डी मार्गाने आली. मोठा धोका पत्करून चोरट्यांविरुद्ध चालविलेल्या या मोहिमेदरम्यान पोलिसांच्या ‘सायरन’चा आवाज आल्याने मनातील भीतीच गेली व खूपच ‘आधार’ वाटल्याचे सचिन औटे, उद्धव सुपेकर, गौतम सुपेकर, रामेश्वर सुपेकर आदींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  

Web Title: Stop the thieves session!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.