सोलापूर मार्गावर मिरजगावमध्ये रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:12 IST2018-07-26T12:11:44+5:302018-07-26T12:12:00+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नगर-सोलापूर राज्यमार्ग रोखण्यात आला होता.

सोलापूर मार्गावर मिरजगावमध्ये रास्ता रोको
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नगर-सोलापूर राज्यमार्ग रोखण्यात आला होता.
आंदोलकांनी मार्गावर जागोजागी टायर पेटवल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी भव्य मोर्चा काढून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. काही वेळ रास्तारोको केल्यानंतर या मोचार्चे रूपांतर जाहिर सभेत झाले. मिरजगाव शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला.