पिंपळगाव जोगा आवर्तनासाठी देवीभोयरे येथे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:49 IST2018-11-13T12:49:25+5:302018-11-13T12:49:30+5:30
पिंपळगाव जोगा धरणाचे आवर्तन सुटून १५ दिवस होऊनही पारनेर तालुक्यातील गावांनी पाणी मिळाले नाही.

पिंपळगाव जोगा आवर्तनासाठी देवीभोयरे येथे रास्ता रोको
पारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे आवर्तन सुटून १५ दिवस होऊनही पारनेर तालुक्यातील गावांनी पाणी मिळाले नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पाणी मिळण्याच्या मागणीसाठी देवीभोयरे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
अळकुटी, राधे, देवीभोयरे फाटा या गावांसह परिसरात पाणी आले नसल्याने सकाळी ९ वाजल्यापासून रास्ता रोको सुरु करण्यात आले. विश्वानाथ कोरडे, शिवाजी औटी, संतोष काटे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले.