गिरणीच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:30 IST2016-04-09T00:19:49+5:302016-04-09T00:30:43+5:30
राहुरी : राहुरी सुतगिरणीसाठी दिलेल्या जमिनी मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात याव्यात, या मागणीसाठी नगर-मनमाड राज्यमार्गावर जोगेश्वरी आखाडा परिसरात शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले़

गिरणीच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
राहुरी : राहुरी सुतगिरणीसाठी दिलेल्या जमिनी मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात याव्यात, या मागणीसाठी नगर-मनमाड राज्यमार्गावर जोगेश्वरी आखाडा परिसरात शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले़ आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने सहाय्यक निबंधक आऱ बी़ खिस्ती यांना निवेदन सादर करण्यात आले़
राहुरी सुतगिरणी स्थापन करताना केवळ पाचशे रूपये एकर या दराने शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या़ राहुरी तालुक्याच्या उत्कर्षासाठी शेतकऱ्यांनी त्याग केला़ शासकीय दराने शेतकऱ्यांना जमिनी मूळ मालकांना देण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारीरास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रोहिदास धनवडे, संजय येवले, भाऊसाहेब पगारे, परसराम भुजाडी यांची भाषणे झाली़ विठ्ठल येवले, ज्ञानदेव हारदे, सीताराम धनवडे, कैलास धनवडे, जिजाबा गिते आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)