शिर्डीतील वीज कनेक्शन तोडणे थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:29+5:302021-07-23T04:14:29+5:30
शहरात वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई तत्काळ थांबवावी. सध्या सर्व शिर्डीकर आर्थिक अडचणींमुळे त्रस्त झाले आहेत. साईमंदिर अजूनही भक्तांना दर्शनासाठी ...

शिर्डीतील वीज कनेक्शन तोडणे थांबवा
शहरात वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई तत्काळ थांबवावी. सध्या सर्व शिर्डीकर आर्थिक अडचणींमुळे त्रस्त झाले आहेत. साईमंदिर अजूनही भक्तांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे रोजगारही पूर्णपणे बंद आहे. शिर्डीकरांनी प्रामाणिकपणाने लाईट बिल भरण्यास सहकार्य केले आहे. सध्या कोविडमुळे मात्र नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिर्डीकरांचा सर्व व्यवसाय हा साई मंदिरावर अवलंबून आहे. व्यवसाय नसल्याने नागरिकांना दोन वेळचे जेवणाचे हाल होत आहेत. त्यातच वीज बिलापोटी वीज कनेक्शन बंद करण्यात येत आहे. ही कारवाई तत्काळ थांबवण्यात यावी. मंदिर चालू झाल्यानंतर नागरिक वीज बिल भरणारच आहेत. वीज तोडणी तत्काळ थांबवली नाही तर उपोषणास बसण्याचा निर्णय या नगरसेवकांनी घेतला आहे.
निवेदनाच्या प्रती ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे व वीज वितरण कपंनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.