अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी गेेलेल्या पोलिसांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:22 IST2021-05-06T04:22:48+5:302021-05-06T04:22:48+5:30
बारागाव नांदूरमध्ये अवैध गावठी दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी एका पोलीस अधिकाऱ्यांसह दोन कर्मचारी गेले होते. ४० ते ५० महिलांनी पोलिसांवर ...

अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी गेेलेल्या पोलिसांवर दगडफेक
बारागाव नांदूरमध्ये अवैध गावठी दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी एका पोलीस अधिकाऱ्यांसह दोन कर्मचारी गेले होते. ४० ते ५० महिलांनी पोलिसांवर अचानक हल्ला केला. यामध्ये दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या खासगी वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. हल्ला सुरू असतानाच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावरून पळाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेपूर्वीच राहुरी तालुक्यातील, वळण गावामध्ये दारूअड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही अज्ञात इसमाने दगडफेक केली होती. परिस्थिती पाहून पोलीस तेथून निघून गेले. मात्र काही क्षणात या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. मात्र, तोपर्यंत दगडफेक करणारी व्यक्ती पसार झाली. पोलिसांवर दगडफेक कुठल्या कारणातून झाली. हे मात्र समजू शकले नाही. याबाबत पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याशी संपर्क साधला असता पोलिसांवर हल्ला झाला नाही, असे त्यांनी सांगितले.