चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:18+5:302021-06-03T04:16:18+5:30
२८ मे रोजी देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल माधव पठारे यांच्या फिर्यादीवरून शाळेतील वर्गखोल्यांचे कुलूप-दरवाजे ...

चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत
२८ मे रोजी देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल माधव पठारे यांच्या फिर्यादीवरून शाळेतील वर्गखोल्यांचे कुलूप-दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली होती. संशयित आरोपी पिन्या विष्णू बर्डे, तुक्या ऊर्फ तुकाराम अनिल पवार, कैलास जगन्नाथ बर्डे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. चोरी गेलेला मालदेखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. जिल्हा परिषद शाळेत झालेल्या या चोरीचा तपास लागावा म्हणून मागणी होत होती. तीनच दिवसात पोलिसांनी मुद्देमालासह आरोपींच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
020621\img-20210601-wa0238.jpg
देवळाली शाळेतील चोरी गेलेल्या मुद्देमालासह आरोपी गजाआड