हॉटेलमधील पैसे चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:29+5:302021-02-05T06:31:29+5:30
कारमधील म्युझिक टेप चोरला अहमदनगर: शहरातील नित्यसेवा येथे कारमधून चोरट्यांनी म्युझिक टेप, बॅटरी चोरून नेली. २३ जानेवारी रोजी ही ...

हॉटेलमधील पैसे चोरले
कारमधील म्युझिक टेप चोरला
अहमदनगर: शहरातील नित्यसेवा येथे कारमधून चोरट्यांनी म्युझिक टेप, बॅटरी चोरून नेली. २३ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी गणेश भगवान बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश भगवान बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऊसतोड मजुराची बैलजोडी चोरली
अहमदनगर: राहाता येथील गणेशनगर कारखाना परिसरातून चोरट्यांनी ऊसतोड करणाऱ्या मजुराचे ५० हजार रुपये किमतीचे दोन बैल चोरून नेले. २४ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी लाला लिंबा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक कदम हे पुढील तपास करत आहेत.
ट्रकमधून कोलगेटचे बॉक्स चोरले
अहमदनगर: नगर तालुक्यातील आरणगाव येथे पेट्रोलपंपाजवळ उभा केलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी १ लाख ९ हजार रुपये किमतीचे कोलगेटचे बॉक्स चोरून नेले. २३ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात ट्रकचालक अनिल गोविंद देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार पठाण हे पुढील तपास करत आहेत.