कॉम्प्युटर सेंटरमधून पैसे चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:22 IST2021-05-19T04:22:02+5:302021-05-19T04:22:02+5:30
...... घरफोडी करून पैसे दागिने, चोरले अहमदनगर : जामखेड तालुक्यातील जवळा येथे चोरट्यांनी घरफोडी करून ७५ हजार रुपयांची रोख ...

कॉम्प्युटर सेंटरमधून पैसे चोरले
......
घरफोडी करून पैसे दागिने, चोरले
अहमदनगर : जामखेड तालुक्यातील जवळा येथे चोरट्यांनी घरफोडी करून ७५ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. १३ ते १४ मे दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात दयानंद सुभाष कथले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक जानकर हे पुढील तपास करत आहेत.
......
घरातून लॅपटॉप चोरला
अहमदनगर : नगर शहरातील नालेगाव येथील अमित अपार्टमेंट येथील घरातून चोरट्यांनी एक लॅपटॉप चोरून नेला. १६ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात संतोष पोपटराव सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक बोरुडे हे पुढील तपास करत आहेत.