स्थैर्यनिधी संघाचा ‘सहकार मित्र’ पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:18 IST2021-04-03T04:18:34+5:302021-04-03T04:18:34+5:30
अहमदनगर : स्थैर्यनिधी संघाचा डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा राज्यस्तरीय ‘सहकार मित्र’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रोख ५१ हजार ...

स्थैर्यनिधी संघाचा ‘सहकार मित्र’ पुरस्काराने गौरव
अहमदनगर : स्थैर्यनिधी संघाचा डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा राज्यस्तरीय ‘सहकार मित्र’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रोख ५१ हजार रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डोंबिवली येथे रा. स्व. संघाचे प्रांत सहकार्यवाह शरद ओगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे व उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, स्थैर्यनिधीचे संचालक शिवाजीराव कपाळे, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष उ. म. कर्वे, उपाध्यक्ष नं. श. कुलकर्णी, मुख्य व्यवस्थापक गो. गी. परांजपे आदी उपस्थित होते.
....
फोटो - डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा राज्यस्तरीय ‘सहकार मित्र’ पुरस्कार शरद ओगले यांच्या हस्ते स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे व उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी स्वीकारला. यावेळी सतीश मराठे, काका कोयटे, शिवाजीराव कपाळे, उ. म. कर्वे, नं. श. कुलकणी, गो. गी. परांजपे आदी उपस्थित होते.