टेम्पोची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:13+5:302021-03-13T04:37:13+5:30
------------ यशोदानगरमधून मोटारसायकलची चोरी अहमदनगर : सावेडीतील यशोदानगर येथील भाजी बाजारात लावलेली मोटारसायकल चोरी झाल्याची घटना ८ मार्च रोजी ...

टेम्पोची चोरी
------------
यशोदानगरमधून मोटारसायकलची चोरी
अहमदनगर : सावेडीतील यशोदानगर येथील भाजी बाजारात लावलेली मोटारसायकल चोरी झाल्याची घटना ८ मार्च रोजी घडली. याबाबत अमोल पोपट तांबे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांची मोटारसायकल (एमएच १७ एएस ३३४२) यशोदानगर येथील भाजी मार्केटच्या मोकळ्या जागेत लावली होती. कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.
----------
लोखंडी गजाची चोरी
अहमदनगर : रामवाडी येथील बंगल्यासमोरून १५ हजार रूपये किमतीचे लोखंडी गज चोरीला गेले. याबाबत शोयेब फकीर मोहमंद शेख यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या रामवाडी (सर्जेपुरा) येथील बंगल्यासमोर बांधकामासाठी ठेवलेले लोखंडी गज व तारेचे बंडल ९ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेले.
---------------
वाहनाच्या धडेकत महिला ठार
अहमदनगर : भरधाव वेगात आलेल्या वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील महिला ठार झाली. नगर-कल्याण रस्त्यावर निमगाव वाघा (ता. नगर) शिवारात ४ मार्च रोजी हा अपघात झाला. याबाबत संदीप मारूती अंबोरे (वय २१, रा. स्टेशन रोड, अ. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शांताबाई विश्वंभर सावते (वय ४०, स्टेशन रोड) असे मयत महिलेचे नाव आहे. सावते व फिर्यादी अंबोरे त्यांच्या मोटारसायकलवर जात असताना ४ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास निमगाव शिवारात त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात सावते या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.