राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:57+5:302021-03-06T04:19:57+5:30
उत्तर प्रदेश येथील बलिया जिल्ह्यातील पीपरा या गावात राष्ट्रीय संत, समाजसुधारक संत, शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची मूर्ती जाळून ...

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
उत्तर प्रदेश येथील बलिया जिल्ह्यातील पीपरा या गावात राष्ट्रीय संत, समाजसुधारक संत, शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची मूर्ती जाळून विटंबना करण्यात आली. या दोनही घटनांचा निषेध करून हे कृत्य करणाऱ्या जातीयवादी शक्तींवर गुन्हा दाखल करून तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून माजी मंत्री बाबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली समस्त मागासवर्गीय समाज आता रस्त्यावर उतरून न्याय मागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे, राज्य कार्यकारिणी सदस्य मारुती कानडे, जिल्हाध्यक्ष अशोक कानडे, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग, शहराध्यक्ष गणेश कानडे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास कानडे, जिल्हा सचिव संजय पोटे, तालुका संघटक संजय सरवार, कार्याध्यक्ष रमेश दुशिंग, युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, संतोष कानडे, सागर पोटे, योगेश दळवी उपस्थित होते.