शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिक्षक समितीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:13 IST2021-02-22T04:13:51+5:302021-02-22T04:13:51+5:30

आपसी आंतर जिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत तालुका पातळीवर एकसूत्रता नसल्याने, काही शिक्षकांवर सेवाज्येष्ठतेबाबत अन्याय होत असल्याची बाब ...

Statement of Teachers Committee regarding various questions of teachers | शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिक्षक समितीचे निवेदन

शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिक्षक समितीचे निवेदन

आपसी आंतर जिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत तालुका पातळीवर एकसूत्रता नसल्याने, काही शिक्षकांवर सेवाज्येष्ठतेबाबत अन्याय होत असल्याची बाब शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. याबाबत जिल्हाध्यक्ष संजय धामणे व कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे यांनी नुकतेच लेखी निवेदन उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण यांना दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष संजय धामणे, कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, संजय नळे, गुरुकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे, सरचिटणीस सीताराम सावंत, नगर तालुका शिक्षक समिती अध्यक्ष मधुकर मैड, कार्यालयीन चिटणीस विजय महामुनी, प्रकाश मुरकुटे, सलीम शेख, अंबादास मंडलिक, पदवीधरचे कार्याध्यक्ष सुनील नरसाळे, सुरेश कवडे, संतोष शिंदे, अतुल काकडे, प्रवीण थोरात आदी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण यांनी दोन्ही विषयांबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

Web Title: Statement of Teachers Committee regarding various questions of teachers