शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत तनपुरेंना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:16+5:302021-02-05T06:31:16+5:30

अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासह, सेवानिवृत्ती वेतन प्रस्तावांना मंजुरी देऊन सेवानिवृत्त झालेल्या ...

Statement to Tanpur regarding questions of non-teaching staff | शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत तनपुरेंना निवेदन

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत तनपुरेंना निवेदन

अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासह, सेवानिवृत्ती वेतन प्रस्तावांना मंजुरी देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन सुरू करावे, तसेच ७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी २०१९ हे शासन निर्णय रद्द करून सध्या सेवेत असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्‍चिती करून वेतनात लाभ मिळावा, अशा विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री प्राजक्त तनपुरे यांना अहमदनगर येथे सेवानिवृत्त कर्मचारी शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी निवृत्ती कानवडे, एकनाथ देवढे, बाळासाहेब ठोंबरे यांच्यासह महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव संतोष कानडे उपस्थित होते.

-----------

फोटो - २५तनपुरे निवेदन

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत सेवानिवृत्त कर्मचारी शिष्टमंडळाने नगरविकास, ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदन दिले.

Web Title: Statement to Tanpur regarding questions of non-teaching staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.