पारनेर तालुका ओबीसी महासंघाचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:19+5:302021-06-26T04:16:19+5:30
जवळे : पारनेर तालुका अखिल भारतीय राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने पारनेरच्या तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नायब ...

पारनेर तालुका ओबीसी महासंघाचे तहसीलदारांना निवेदन
जवळे : पारनेर तालुका अखिल भारतीय राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने पारनेरच्या तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार अविनाश रणदिवे यांनी निवेदन स्वीकारले.
ओबीसी जनगणना जातीनिहाय करावी, ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत मिळावे, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
यावेळी ओबीसी महासंघाचे पारनेर तालुकाध्यक्ष शिरीष शरद शेलार, अहमदनगर मुस्लिम संघटना तालुकाध्यक्ष आयुब पापाभाई शेख, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे जिल्हा संघटक भानुदास साळवे, पारनेर तालुका तिळवण तेली समाज संघटनेचे खजिनदार अजय पतके, बाळासाहेब शेजवळ, रवींद्र टाक, महेश शेलार, नवनाथ रासकर, सुनील रासकर, आदी उपस्थित होते.
----
२५ पारनेर निवेदन
अखिल भारतीय राष्ट्रीय ओबीसी संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अविनाश रणदिवे यांना देण्यात आले.