माजी खासदार गांधी यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST2021-01-08T05:09:25+5:302021-01-08T05:09:25+5:30

व्ही.आर.डी.ई संरक्षण संस्था नगरमधून स्थलांतरित होण्यास स्थगिती मिळावी, या मागणीचे निवेदन माजी खासदार दिलीप गांधी यांना देताना कर्मचारी ...

Statement to former MP Gandhi | माजी खासदार गांधी यांना निवेदन

माजी खासदार गांधी यांना निवेदन

व्ही.आर.डी.ई संरक्षण संस्था नगरमधून स्थलांतरित होण्यास स्थगिती मिळावी, या मागणीचे निवेदन माजी खासदार दिलीप गांधी यांना देताना कर्मचारी कार्य समितीचे सहसचिव आर. बी. खरमाळे. समवेत उपाध्यक्ष व्ही. एम. वायकर, व्ही.आर.डी.ई कामगार युनियनचे अध्यक्ष शंकर पगार, सचिव सलीम अहमद, कीर्तीरथ कुरेशिया, व्ही.आर.डी.ई एसटीए असोसिएशनचे अध्यक्ष पी. जी. पराशर, व्ही.आर.डी.ई ॲडमीन असोसिएशनचे अध्यक्ष आर. एल. स्वामी, ड्रायव्हर असोसिएशनचे अध्यक्ष ई. जी. घोडे आदी उपस्थित होते.

-----------------

प्रभागनिहाय कामाचे नियोजन

अहमदनगर : जिल्हाधिकारी तथा आयुक्त राजेंद्र भोसले यांनी प्रभागनिहाय कामाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील चारही प्रभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना प्रभागनिहाय कामाचे नियोजन करण्याचे आदेश उपायुक्त संतोष लांडगे यांनी दिले असून पुढील महिनाभरात काय काम करणार, याचेही नियोजन मागविले आहे.

...

साईडपट्ट्यांचा विकासकला विसर

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गाची दुरुस्ती विकासकाकडून करण्यात आली आहे. मात्र, महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या साईडपट‌्ट्या दुरुस्त करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अवजड वाहने रस्त्याच्या खाली उतरल्याने अपघात होत आहेत. साईडपट्ट्या दुरुस्त करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विकासकाला आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे हे काम रखडले असून, त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे.

...

चेंबरचे झाकण निखळल्याने खड्डा

अहमदनगर : शहरातील वाडियापार्क समोरील रस्त्यातून ड्रेनेजलाईन टाकण्यात आलेली आहे. त्यावर चेंबर बांधण्यात आले असून, त्यावरील झाकण निखळले आहे. त्यामुळे मुख्य चौकात मोठा खड्डा पडला आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून, याकडे स्वच्छता विभागाचे दर्लक्ष होत आहे.

....

Web Title: Statement to former MP Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.