राजकीय प्रदूषणाने कुकडीचे आवर्तन दूषित
By Admin | Updated: April 27, 2017 18:55 IST2017-04-27T18:55:00+5:302017-04-27T18:55:00+5:30
कुकडी प्रकल्पाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकºयांच्या अंगणी आले आणि मोडलेल्या प्रपंचाला आकार मिळाला.

राजकीय प्रदूषणाने कुकडीचे आवर्तन दूषित
आ नलाईन लोकमतश्रीगोंदा : कुकडी प्रकल्पाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकºयांच्या अंगणी आले आणि मोडलेल्या प्रपंचाला आकार मिळाला. परंतु गेल्या काही वर्षांपासून श्रीगोंद्यातील दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील मतांचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून कुकडी पाणी प्रश्नावर टोकाचे राजकारण सुरू केले. या राजकीय प्रदुषणात कुकडीचे पाणी दूषित झाले. परिणामी श्रीगोंद्यातील हिरवे मळे करपून शेतकºयांचा श्वास कोंडला आहे.