संत साहित्य विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र

By Admin | Updated: December 16, 2015 23:08 IST2015-12-16T22:38:42+5:302015-12-16T23:08:33+5:30

संगमनेर : ‘संत साहित्याचे समाजप्रबोधनातील योगदान’ या विषयावर संगमनेर महाविद्यालयात गुरुवारपासून दोन दिवस राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

State-level seminars on the subject of Saint literature | संत साहित्य विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र

संत साहित्य विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र

संगमनेर : ‘संत साहित्याचे समाजप्रबोधनातील योगदान’ या विषयावर संगमनेर महाविद्यालयात गुरुवारपासून दोन दिवस राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता चर्चासत्राचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी नियोजित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस असणार आहेत. यावेळी डॉ. संजय मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दा. ज. मालमापी आणि ब. ना. सारडा महाविद्यालाच्या वतीने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. विविध व्याख्याते व मान्यवरांच्या उपस्थितीत सात चर्चासत्रे होतील, अशी माहिती प्राचार्य डॉ. केशव देशमुख, प्रा. रघुनाथ खरात व डॉ. अशोक लिंबेकर यांनी दिली. दि. १८ रोजी सायंकाळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ दिलीप धोंडगे, जसपाल डंग, प्राचार्य के. के. देशमुख यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: State-level seminars on the subject of Saint literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.