वारुळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:16 IST2021-01-09T04:16:41+5:302021-01-09T04:16:41+5:30
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य नगरपालिका - महानगरपालिका शिक्षक संघातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार कोपरगाव नगर परिषद शाळेच्या ...

वारुळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य नगरपालिका - महानगरपालिका शिक्षक संघातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार कोपरगाव नगर परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका तेजस वारुळे - शिंदे यांना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते लोणावळा येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरणप्रसंगी पुरंदरचे आ. संजय जगताप, राज्य शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, औदुंबर उकिरडे, शिक्षण उपसंचालक सुनील शेळके, अर्जुन कोळी उपस्थित होते. वारूळे यांनी विद्यार्थीभिमुख मनोरंजक उपक्रम राबविले. टाकाऊपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्यनिर्मिती, शैक्षणिक ब्लाॅग, शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती, तंत्रज्ञानाचा योग्य वापर यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. वारुळे यांना प्रशासनाधिकारी मोहनीश तुंबारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सुनील राहणे, विलास माळी, अरुण पगारे व नगरपालिका शिक्षकांनी वारुळे यांनी कौतुक केले आहे.