नवनाथ घुले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:33+5:302021-09-10T04:27:33+5:30

अहमदनगर : राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल व गोरे डेंटल हॉस्पिटल आयोजित कै. तुकाराम गोरे ...

State Level Ideal Teacher Award to Navnath Ghule | नवनाथ घुले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

नवनाथ घुले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

अहमदनगर : राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल व गोरे डेंटल हॉस्पिटल आयोजित कै. तुकाराम गोरे गुरूजी स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नगर तालुक्यातील नृसिंह माध्यमिक विद्यालयाचे गणित शिक्षक नवनाथ घुले यांना माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी डॉ. सुदर्शन गोरे, रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल दादासाहेब करंजुले, संजय गारूडकर, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष ईश्वर बोरा, सचिव डॉ. दिलीप बागल, गणित संघटनेचे अध्यक्ष कल्याण ठोंबरे आदी उपस्थित होते. घुले यांचे राजमाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बबनराव घोलप, सचिव शाम घोलप, मुख्याध्यापक प्रकाश ठोंबरे आदींनी अभिनंदन केले.

----------

फोटो - ०९घुले पुरस्कार

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नगर तालुक्यातील नृसिंह माध्यमिक विद्यालयाचे गणित शिक्षक नवनाथ घुले यांना माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Web Title: State Level Ideal Teacher Award to Navnath Ghule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.