काकडे विद्यालयात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:39 IST2021-02-21T04:39:44+5:302021-02-21T04:39:44+5:30
शेवगाव : जिल्हा जनशक्ती क्रीडा, युवा विकास मंडळ शेवगाव, आझाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या क्रीडांगणावर ...

काकडे विद्यालयात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा
शेवगाव : जिल्हा जनशक्ती क्रीडा, युवा विकास मंडळ शेवगाव, आझाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा ‘आझाद चषक २०२१’ आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या उपस्थितीत व जिल्हा जनशक्ती क्रीडा व युवा विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, पोलीस निरीक्षक सोपान गोरे, तालुका आरोग्य अधिकारी शेवगाव डॉ.सलमा हिराणी, प्रा.लक्ष्मण बिटाळ शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रवीण बारस्कर, वजीर पठाण, प्रदीप काळे, सुनील काकडे, कारभारी गलांडे, विश्वस्त महादेव नागरे, पडोळे सर, पुष्पलता गरुड, विनोद मोहिते, ईश्वर मगर, अमजद पठाण, शाहरुख शेख, शरद जोशी, प्राचार्य आहेर, प्राचार्य वसावे, क्रीडा विभाग प्रमुख रामेश्वर पालवे, अरुण काळे, विकास देहाडराय आदी उपस्थित होते.