राज्य नाट्य स्पर्धेचा बिगुल वाजला
By Admin | Updated: November 3, 2016 01:01 IST2016-11-03T00:39:29+5:302016-11-03T01:01:07+5:30
अहमदनगर : हौशी रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी राज्य नाट्य स्पर्धा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे़ या स्पर्धेत नगर शहर व जिल्ह्यातील

राज्य नाट्य स्पर्धेचा बिगुल वाजला
अहमदनगर : हौशी रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी राज्य नाट्य स्पर्धा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे़ या स्पर्धेत नगर शहर व जिल्ह्यातील १५ नाट्य संस्थांनी सहभाग घेतला आहे़ ही स्पर्धा म्हणजे नगरकरांसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरते़
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी हौशी नाट्यकर्मींसाठी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा घेतली जाते़ स्पर्धेचे हे ५६ वे वर्षे आहे़ राज्यातील विविध केंद्रांवर या स्पर्धेची प्राथमिक फेरी घेतली जाते़ नगर केंद्रावरील प्राथमिक फेरी ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे़
दररोज सायंकाळी ८ वाजता येथील माऊली संकुलातील सभागृहात या स्पर्धेतील विविध नाटके सादर केली जाणार आहेत़ यातून प्रथम क्रमांकाच्या नाटकाची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येणार आहे़ २२ नोव्हेंबरला स्पर्धेचा समारोप होणार आहे़
८ नोव्हेंबरला जिल्हा हौशी नाट्य संघ, नगर (दिग्दर्शक -अमोल साळवे), ९ नोव्हेंबरला एकात्मता युवक मंच (दिग्दर्शक नाना मोरे), १० नोव्हेंबरला जिप्सी प्रतिष्ठान (दिग्दर्शक-शशिकांत नजान), ११ नोव्हेंबरला कार्ने अकादमी, श्रीरामपूर( दिग्दर्शक अजय घोगरे), १२ नोव्हेंबरला नगर तालुका कला क्रीडा अकादमी (दिग्दर्शक- काशिनाथ सुलाखे), १३ नोव्हेंबरला नवरंग नाट्य प्रतिष्ठान (दिग्दर्शक - गोकुळ क्षीरसागर), १४ नोव्हेंबरला ओम गुरुदेव माध्यमिक विद्यालय (कोपरगाव), १५ नोव्हेंबरला रंगकर्मी प्रतिष्ठान (दिग्दर्शक- सतीश लोटके), १६ नोव्हेंबरला रंगोदय प्रतिष्ठान (दिग्दर्शक - सागर खिस्ती), १७ नोव्हेंबरला साईप्रीत प्रतिष्ठान (संजय लोळगे), १८ नोव्हेंबरला सप्तरंग थिएटर्स (दिग्दर्शक -श्याम शिंदे), १९ नोव्हेंबरला सार्थक बहुउद्देशीय संस्था (दिग्दर्शक - संदीप कदम), २० नोव्हेंबरला सद्गुरू बहुउद्देशीय संस्था (दिग्दर्शक - रवींद्र वाणी), २१ नोव्हेंबरला सूर्यतेज संस्था, कोपरगाव (डॉ़ मयूर तिरमुखे), २२ नोव्हेंबरला यद्न्यवल्क्य नागरी पतसंस्था (दिग्दर्शक - अमित खताळ) या संस्थांची नाटके होणार आहेत़
(प्रतिनिधी)
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी केंद्र स्तरावर समन्वयकाची नियुक्ती करण्यात येते़ या वर्षी स्पर्धेचे समन्वयक म्हणून नगरमधील नाट्यकर्मी सागर मेहेत्रे यांची निवड करण्यात आली़ निवडीनंतर मेहेत्रे यांनी स्पर्धक संघांची बैठक माऊली संकुलाच्या सभागृहात घेऊन नाटक सादरीकरणाची वेळ रात्री ८ वाजताची ठरविली़ यावेळी सतीश लोटके, श्याम शिंदे, शशिकांत नजान, रितेश साळुंके, संजय लोळगे, सागर खिस्ती, अमित खताळ, अमोल साळवे उपस्थित होते़