आमदाराकडून केडगाव प्रकरणाला राजकीय रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:22 IST2018-05-19T05:22:27+5:302018-05-19T05:22:32+5:30
केडगाव हत्याकांडाला शिवेसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी राजकीय वळण देऊन त्याचा राजकीयदृष्ट्या फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे़

आमदाराकडून केडगाव प्रकरणाला राजकीय रंग
अहमदनगर : केडगाव हत्याकांडाला शिवेसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी राजकीय वळण देऊन त्याचा राजकीयदृष्ट्या फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे़ या घटनेला शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय रंग दिला जात आहे़ शिवसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात येऊ नये, यासाठी नि:पक्षपातीपणे तपास करणाऱ्या यंत्रणेवरच संशय घेतला जात आहे़ त्यामुळे केडगाव हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे द्यावा, असा अहवाल जिल्हा पोलीस प्रशासनाने गृहविभागाकडे पाठविला आहे़
केडगाव हत्याकांडाचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास वर्ग करण्यासंदर्भात पोलीस महासंचालकांकडे अहवाल पाठवण्यात आला़ अहवालात राठोड यांच्यासह त्यांचा शिवसेना शहर प्रमुख यांच्या राजकीय हस्तक्षेपाची यादीच सादर केली आहे़