नेवाशात हमीभाव केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:20 IST2021-01-21T04:20:18+5:302021-01-21T04:20:18+5:30

नेवासा : यावर्षी तयार झालेल्या तुरीला बाजारात भाव वाढत आहेत. केंद्र सरकारने तुरीसाठी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर ...

Start a guarantee center in Nevasa | नेवाशात हमीभाव केंद्र सुरू करा

नेवाशात हमीभाव केंद्र सुरू करा

नेवासा : यावर्षी तयार झालेल्या तुरीला बाजारात भाव वाढत आहेत. केंद्र सरकारने तुरीसाठी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत शासकीय तूर खरेदी केंद्र चालू न झाल्याने अत्यल्प भावात शेतकऱ्यांनी तूर विक्री करावी लागत आहे, असे तालुका भारतीय जनसंसदने निवेदनात म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने नाफेडमार्फत राज्यभरात खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी कंपन्या यांच्या माध्यमातून तूर, हरभरा, सोयाबीन, मका आदींची हमीभावाने खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो. हमीभाव खरेदीचा लाभ अनेक शेतकरी घेतात.

सरकारने यावर्षी ६ हजार रुपये हमीभावाने तूर खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकरी कंपन्यांनी आॕफलाईन नोंदणी सुरु केलेली आहे.

Web Title: Start a guarantee center in Nevasa