रखडलेले प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:03+5:302021-02-05T06:31:03+5:30
गावकऱ्यांची दर्शन व्यवस्था सुलभ करणे, लेझर शो, गार्डन, यासारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणे. संस्थानची रुग्णालये अद्ययावत करणे. साईनाथ ...

रखडलेले प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत
गावकऱ्यांची दर्शन व्यवस्था सुलभ करणे, लेझर शो, गार्डन, यासारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणे. संस्थानची रुग्णालये अद्ययावत करणे. साईनाथ हॉस्पिटलमध्ये नाममात्र फी आकारून उच्चविद्याभूषित अनुभवी डॉक्टरांची नेमणूक करावी. साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्टरांसारखे सुविधा, इन्सेंटिव्ह देणे, प्रसादालयात नाममात्र चार्ज आकारणी करून भोजन व्यवस्था दर्जेदार करणे. संस्थान निवास व्यवस्थेच्या रूमचे दर वाढविणे. नगरपंचायत हद्दीतील स्वच्छता ई-टेंडर पद्धतीने संस्थानने स्वतः करावी. संस्थान व शिर्डी गावची होत असलेली बदनामी थांबविणे. शिर्डीतील तथाकथित प्रतिष्ठित ग्रामस्थांकडून होणारी दर्शन दलाली बंद होणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, शिवसेना नेते कमलाकर कोते, बाबासाहेब कोते, माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, उपनगराध्यक्ष सचिन कोते, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, मंगेश त्रिभुवन, दत्तात्रय कोते, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते, ॲड. अनिल शेजवळ, ताराचंद कोते, अशोक कोते, जितेंद्र शेळके, नारायण लुटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमृत गायके, सोसायटीचे माजी चेअरमन साईराम गोंदकर, रोटरीचे माजी अध्यक्ष गफ्फारखान पठाण, चंद्रकांत गोंदकर, अमोल कोते, शुभम कोते उपस्थित होते.
डॉ. गोंदकर म्हणाले, साई संस्थानकडे यापूर्वी शिर्डी ग्रामस्थांनी विविध मागण्या केल्या आहेत. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्ष त्याची कृती झाल्यानंतरच सत्कार करणे योग्य ठरेल. याशिवाय ग्रामस्थांच्या दर्शनासंदर्भात संस्थानने न्यायालयाकडे काय मुद्दे मांडले आहेत हे ग्रामस्थांना माहीत होणे गरजेचे आहे. कैलासबापू कोते म्हणाले, शिर्डीचा विकास झाला पाहिजे. हॉटेल व्यवसायासह अन्य धंद्यांना चालना मिळावी. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. कैलासबापू कोते म्हणाले, शिर्डीचा विकास झाला पाहिजे. हॉटेल व्यवसायासह अन्य धंद्यांना चालना मिळावी. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. कमलाकर कोते, नीलेश कोते, उपनगराध्यक्ष सचिन कोते यांनी मत व्यक्त केले. सूत्रसंचालन नगरसेवक मंगेश त्रिभुवन यांनी केले.
( ३१ शिर्डी )