सोशल मीडियातून एसटी भरतीची अफवा

By Admin | Updated: July 13, 2016 00:35 IST2016-07-13T00:10:34+5:302016-07-13T00:35:37+5:30

अहमदनगर : इंटरनेट, व्हॉटस्अ‍ॅप तसेच इतर सोशल मीडियातून सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात भरतीबाबत अफवा पसरविण्यात येत आहे.

ST recruitment rumors from social media | सोशल मीडियातून एसटी भरतीची अफवा

सोशल मीडियातून एसटी भरतीची अफवा


अहमदनगर : इंटरनेट, व्हॉटस्अ‍ॅप तसेच इतर सोशल मीडियातून सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात भरतीबाबत अफवा पसरविण्यात येत आहे. सध्या एसटी महामंडळातर्फे कोणतीही भरती सुरू नाही, त्यामुळे नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन एसटी विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून एका वेबसाईटच्या लिंकवर एसटीतील तब्बल ६ हजार ५७५ जागा भरण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या जागांसाठी अर्ज कसे करावेत, याबाबतही त्यात उल्लेख आहे. तसेच व्हॉटस्अ‍ॅपवरही याबाबत माहिती व्हायरल होत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला. एसटी विभागाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी या जाहिराती खोट्या असल्याचे सांगितले. राज्य परिवहन मंडळाची अधिकृत भरती असेल तर त्या संदर्भात जाहिरात त्यांच्या ६६६.े२१३ू.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर, तसेच वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येते. त्यामुळे सोशल मीडियातून पसरलेल्या या खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नगरचे विभाग नियंत्रक अशोक जाधव यांनी केले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: ST recruitment rumors from social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.