एस.टी. बस सुरू करण्यासाठी वंचित आघाडीचे डफली बजाव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 15:24 IST2020-08-12T15:23:10+5:302020-08-12T15:24:10+5:30
राज्य सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. येथील बसस्थानकावर आघाडीच्या वतीने बुधवारी डफली बजाव आंदोलन करण्यात आले.

एस.टी. बस सुरू करण्यासाठी वंचित आघाडीचे डफली बजाव आंदोलन
श्रीरामपूर : राज्य सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. येथील बसस्थानकावर आघाडीच्या वतीने बुधवारी डफली बजाव आंदोलन करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केली. त्यामुळे चार महिन्यांपासून बससेवा बंद आहे.
बससेवा बंद झाल्यामुळे गोरगरिब व कष्टकरी जनतेला प्रवासासाठी अडचणी येत आहेत. त्यांच्या उपजिवीकेवर त्याचा वाईट परिणाम झाला आहे. सरकारने किमान ५० टक्के वाहतूक व्यवस्था सुरू करावी अन्यथा राज्यभर डफली बजाव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आघाडीच्या प्रवक्त्या दिशा शेख, गौतम राऊत, अमोल सोनवणे यांनी दिला आहे.