श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर अपघात, एक जण ठार
By शिवाजी पवार | Updated: June 5, 2023 16:13 IST2023-06-05T16:13:50+5:302023-06-05T16:13:57+5:30
श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर मोटरसायकलने पाठीमागून धडक दिल्यामुळे एकाच मृत्यू झाला.

श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर अपघात, एक जण ठार
श्रीरामपूर (अहमदनगर) : श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर मोटरसायकलने पाठीमागून धडक दिल्यामुळे एकाच मृत्यू झाला. अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मयताचे नाव चंद्रकांत माधव बाहुले असे आहे. ते श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती भागात राहतात. श्रीरामपूरहुन बेलापूरकडे जात असताना मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्यामुळे ते पाई गाडी ढकलत चालले होते. यावेळी पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून येणाऱ्या एका मोटारसायकलने बाहुले यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.
मोटारसायकलवरील एक जण गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार रामेश्वर ढाकणे, संपत बडे, हरीश पानसंबळ, भारत तमनर तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
नागरिकांची यावेळी मोठी गर्दी झाली. दोन्ही जखमींना श्रीरामपूर येथे रुग्णालय हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच बाहुले यांचे निधन झाले. पोलिस उपनिरीक्षक हापसे हे अधिक तपास करत आहेत.