श्रीगोंद्यात कारागृहातच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:46 IST2019-03-29T16:46:44+5:302019-03-29T16:46:55+5:30
श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहात अटकेत असणाऱ्या गोट्या बंडू काळे (वय २४, रा. आखोनी, ता. कर्जत) या आरोपीने शुक्रवारी (दि.२९) पहाटे चारच्या सुमारास लोखंडी भांडे गळ्याभोवती मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

श्रीगोंद्यात कारागृहातच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहात अटकेत असणाऱ्या गोट्या बंडू काळे (वय २४, रा. आखोनी, ता. कर्जत) या आरोपीने शुक्रवारी (दि.२९) पहाटे चारच्या सुमारास लोखंडी भांडे गळ्याभोवती मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
काष्टी येथील दरोड्यात गोट्या बंडू काळे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याला नंदूरबार येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पहाटे चारच्या अगोदर आरोपी गोट्या काळे याने शौचालयात वापरल्या जाणाºया लोखंडी भांड्याच्या सहायाने सुरुवातीला डाव्या हाताची नस कापन्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गळ्याभोवती लोखंडी भांड्याने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार केल्यानंतर तो परत येऊन झोपला. पोलीस कर्मचाऱ्यांनी झोपलेल्या आरोपींना उठवले. त्यात गोट्या काळे यालाही उठविण्यात आले. त्याच्या शर्टला रक्त लागलेले होते. हे लक्षात येताच त्याच्याकडे विचारपूस करण्यात आली. त्यानंतर त्याला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.