नगरमध्ये पावसाचा शिडकावा
By Admin | Updated: May 13, 2017 13:56 IST2017-05-13T13:56:17+5:302017-05-13T13:56:17+5:30
नगरमध्ये शनिवारी सकाळी हलका पाऊस झाला़ थोडावेळ झालेल्या रिमझिम पावसाने वातावरणातही गारवा निर्माण झाला़
_ns.jpg)
नगरमध्ये पावसाचा शिडकावा
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ १३ - नगरमध्ये शनिवारी सकाळी हलका पाऊस झाला़ थोडावेळ झालेल्या रिमझिम पावसाने वातावरणातही गारवा निर्माण झाला़ शुक्रवारी रात्रीपासूनच वातावरणात उकाडा होता़ तसेच ढगाळ हवामानामुळे त्यात आणखी भर पडली़ सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरु झाला़ अवघ्या दहा मिनिटभर झालेल्या या पावसाने रस्ते ओलेचिंब झाले़ जिल्ह्याच्या अनेक भागात असा पाऊस झाल्याचे वृत्त आहे़ त्यानंतर उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकला आहे़ दरम्यान वीज पुरवठा खंडित असल्यामुळे नागरिक घामाघुम झाले आहेत़