बांधापर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST2021-05-19T04:20:30+5:302021-05-19T04:20:30+5:30

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत काटेकोर सिंचनासाठी माहिती ...

Spread the technology to the dam | बांधापर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार करा

बांधापर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार करा

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत काटेकोर सिंचनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर या प्रशिक्षणवर्गाच्या ऑनलाईन समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली पुसाचे आंतरराष्ट्रीय जलव्यवस्थापन प्रमुख संशोधक डॉ. अशोक सिक्का उपस्थित होते.

डॉ. अशोक फरांदे, दापोलीचे डॉ. राजेश थोरात, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. सचिन डिंगरे तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

डॉ. अशोक सिक्का म्हणाले की, शेतीमध्ये पाणी हा महत्त्वाचा घटक असला तरी शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी पीक, माती, खत आणि पोषक व्यवस्थापनासह त्याचे एकात्मीकरण तितकेच महत्त्वाचे आहे. देशात सिंचनाची कार्यक्षमता कमी आहे म्हणूनच आपल्याला पाण्याचा वापर, त्याची उत्पादकता आणि क्षमता वाढविण्यासाठी विविध मार्ग अवलंबिण्याची गरज आहे. या प्रशिक्षणास सात राज्यांतून १५३ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंगल पाटील यांनी, तर आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले. या २१ दिवस प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी डॉ. सचिन डिंगरे, डॉ. प्रज्ञा जाधव व डॉ. मंगल पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

Web Title: Spread the technology to the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.