योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: November 7, 2016 00:54 IST2016-11-07T00:16:55+5:302016-11-07T00:54:01+5:30
नेवासा : पतंजली योगपीठ हरिद्वार व शिक्षण विभागाच्यावतीने येथील ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित योग शिबिरास रविवारी प्रारंभ झाला.

योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेवासा : पतंजली योगपीठ हरिद्वार व शिक्षण विभागाच्यावतीने येथील ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित योग शिबिरास रविवारी प्रारंभ झाला. शिबिराच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांसह योगप्रेमी नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी पतंजली योगपीठाचे संजयजी, योग प्रचारक डॉ. कुंदन आर्य व कृष्णाजी यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केले. स्वस्थ जीवनासाठी योगाचे महत्व सांगताना संजयजी म्हणाले की योगामुळे शरीर निरोगी,मन प्रसन्न व बुद्धी तल्लख होते.दि १६ नोव्हेंबर रोजी खडकाफाटा येथे स्वामी रामदेवजी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पतंजली दूध प्रकल्पाचे उदघाटन प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण यावेळी दिले.
या शिबिराचा शुभारंभ ह.भ.प शिवाजी महाराज देशमुख, आ.बाळासाहेब मुरकुटे, तहसीलदार नामदेव टिळेकर,शिक्षण विभागाचे डॉ. वाळले, संजयजी यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने झाला.यावेळी तालुका शिक्षण विभागाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
हे शबिर १० नोव्हेंबरपर्यंत सकाळी ६.३० ते ८.३० वाजता श्री ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात सुरु राहणार असून यामध्ये शारीरिक व्याधीवर मार्गदर्शन केले जाणार आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे़
शिबिराच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय शिंदे सर,विक्रम गोसावी,महेश मापारी,गोरक्षनाथ घुले,मोहिनीराज जाधव, सतीश गायके व गोदावरी ग्रुप चे सदस्य क्रियाशील आहेत