वाजेवाडीतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:52+5:302021-07-14T04:23:52+5:30
निघोज : स्व. अनंत शंकर वाजे यांच्या दशक्रियानिमित्त व स्वातंत्र्यसेनानी ‘लोकमत’चे संपादक स्व. जवाहरलालजी उर्फ बाबूजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ...

वाजेवाडीतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
निघोज : स्व. अनंत शंकर वाजे यांच्या दशक्रियानिमित्त व स्वातंत्र्यसेनानी ‘लोकमत’चे संपादक स्व. जवाहरलालजी उर्फ बाबूजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त वडनेर बुद्रूक ग्रामपंचायत अंतर्गत वाजेवाडी (ता.पारनेर) येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथे ६९ जणांनी रक्तदान केले.
वडनेर बुद्रूक ग्रामपंचायत, वाजेवाडी ग्रामस्थ, शिवबा संघटना यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी ग्रामसमृद्धी फाउंडेशनने रक्तदात्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप केले. वाजेवाडीकर एकता मंचचे प्रदीप वाजे परिवारातर्फे सर्व रक्तदात्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
सरपंच राहुल सुकाळे, उपसरपंच पूनम खुपटे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, उद्योजक रमेश वरखडे, माजी सरपंच स्वाती नऱ्हे, रेखा येवले, माजी उपसरपंच रमेश वाजे आदींच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला सकाळी सुरवात झाली. यावेळी सैनिक बँकेचे उपाध्यक्ष शिवाजी सुकाळे, निघोजचे उपसरपंच माउली वरखडे, संदीप पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास कवडे, शिवा पाटील पवार, पांडुरंग येवले, अनिल नऱ्हे, भिमाजी वाजे, वैशाली जोरी, सुप्रिया म्हस्के, प्रदीप बोचरे, रणजित बाबर, बाबाजी बोचरे, मोहिनी वाजे, विवेक वाजे, रोहित वाजे, कैलास वाजे, गणेश वाजे, ग्रामसमृद्धी फाउंडेशनचे विक्रम वाजे, महेश बोचरे, लहू बोचरे आदी उपस्थित होते.
यावेळी सुधाकर महाराज यांचे प्रवचनही झाले. रक्तदानासाठी अहमदनगर रक्तपेढीचे डॉ. राजेंद्र पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. स्व. अनंत वाजे यांच्या स्मरणार्थ एक बेलाचे झाड लावण्यात आले. या उपक्रमाबद्दल विक्रम वाजे व वैभव वाजे यांचे कौतुक होत आहे.
----
आजचे रक्तदाते..
नामदेव जगदाळे, दीपक वाजे, उत्तम वाजे, रमेश बदर, दत्ता चौधरी, प्रदीप बोचरे, सचिन वाजे, नवनाथ बोचरे, नंदा वाजे, सुनीता वाजे, नवनाथ वाजे, स्वाती नऱ्हे, सौरव बोचरे, संदीप वाजे, दत्तात्रय वाजे, वैभव वाजे, देविदास बोचरे, ज्ञानेश्वर वाजे, कचरू वाजे, कृष्णा वाजे, लहूकिसन बोचरे, कैलास वाजे, नेहा वाजे, गणेश वाजे, ज्ञानेश्वर बाळू वाजे, अश्विनी वाजे, मोहिनी वाजे, अविनाश वाजे, लिलेश तरटे, ऋषीकेश घोगरे, गणेश चौधरी, सीमा बोचरे, ऋतिक वाजे, विशाल बोचरे, पूनम खुपटे, मच्छिंद्र वाजे, ऋतिक बोचरे, नारायण बोचरे, विक्रम वाजे, गणेश वाजे, विक्रम वाजे, वैभव वाजे, कुंडलिक बाबर, सुप्रिया म्हस्के, मनीषा वाजे, अनिल शेटे, लहू गागरे, निलेश वरखडे, शांताराम पाडळे, रोहन वरखडे, गणेश चौधरी, स्वप्नील लामखडे, खंडू लामखडे, शांताराम लामखडे, रोहिदास लामखडे, निखिल लामखडे, विठ्ठल लामखडे, युवराज बढे, एकनाथ मेसे, ठकाराम खोडदे, विकास मोरे, भिमाजी वाजे, कविता बोचरे, रमेश वाजे, पांडुरंग येवले, महेश बोचरे, महेश बोचरे, बाबाजी वाजे, गोरख बोचरे.